जळगाव : प्रतिनिधी
शहरातील मेहरूण परिसरातील एका पाचव्या मजल्यावरून पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, मेहरूण परिसरातील औदुंबर रविंद्र पाटील (वय-२९) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह राहत होता. सोमवारी २ मे रोजी दुपारी वाजेच्या एका पाचव्या मजल्यावरून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. इमारतीकडून जाणाऱ्या येणाऱ्या नागरीकांच्या हा प्रकार दिसून आल्याने घटना उघडकीला आली. याबाबत एमआयडीसी पोलीसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ रतिलाल पाटील हे करीत आहे.





















