भुसावळ : प्रतिनिधी
भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस बाळगणार्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. शेख सद्दाम शेख गफ्फार (वय 28, जाम मोहल्ला, रजा टॉवर, भुसावळ) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.
दोन काडतूससह कट्टा जप्त
आरोपीच्या ताब्यातून 15 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा, मॅग्झीन व एक हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. ही कारवाई शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी सचिन पोळ यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक शांताराम महाजन करीत आहेत.