भुसावळ :प्रतिनिधी
भुसावळ रेल्वे विभागातील पाच कर्मचार्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेवून त्यांना ‘मॅन ऑफ द मंथ’ या पुरस्काराने भुसावळ डीआरएम एस.एस.केडीया यांच्याहस्ते गौरवण्यात आले.
सन्मानीत करण्यात आलेल्या कर्मचार्यांमध्ये भुसावळचे लोकोपायलट डी.डी.कोल्हे, मुख्य कार्यालय अधीक्षक दिलीप पाटील यांच्यासह बडनेरातील लाईनमन उमेद कांबळे, भुसावळचे टेक्नीशीयन राहुल सुरेश पाटील, लोको पायलट हेमराज मीना यांचा समावेश आहे. प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देवून कर्मचार्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास अपर मंडल रेल प्रबंधक नवीन पाटील, रुकमैया मीना, वरीष्ठ मंडल कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.