जळगाव मिरर | ४ जानेवारी २०२४
आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात कोळसा घेऊन निघालेला ट्रक व प्रवासी बसची समोरासमोर धडक झाल्याने बुधवारी झालेल्या अपघातात १२ ठार, तर ३८ प्रवासी जखमी झाले. मृतांमध्ये ६ महिला व ३ चिमुकल्यांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृतांबद्दल शोक व्यक्त करत जखमींसाठी प्रार्थना केली.
प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई म्हणून २ लाख, तर जखमींना ५० हजार रुपये देण्याची घोषणा मोदींनी केल्याचे पीएमओकडून स्पष्ट करण्यात आले. जिल्ह्यातील डेरगावनजीकच्या बलिजान क्षेत्रात पहाटे साडेचार वाजता ही दुर्घटना घडली. ४९ लोकांना घेऊन तिनसुकीया जिल्ह्यातील तिलिंगा मंदिराकडे निघालेल्या प्रवासी बसला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने धडक दिली. राज्याचे परिवहन मंत्री परिमल शुल्क वैद्य यांनी अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत.