• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धाब्याचे घर कोसळून १२ वर्षीय बालकाचा मृत्यू : विधवा आईचा आधार हिरावला, परिसरात हळहळ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 30, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
धाब्याचे घर कोसळून १२ वर्षीय बालकाचा मृत्यू : विधवा आईचा आधार हिरावला, परिसरात हळहळ
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० सप्टेंबर २०२५

पाचोरा तालुक्यातील सततच्या अतिवृष्टीने एक दुःखद घटना समोर आली आहे. शहरातील कृष्णापुरी टेकडी गल्लीत असलेल्या धाब्याच्या घराचा मागील भाग सोमवारी दुपारी अचानक कोसळल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून महेश नितिन राणे (वय १२) या बालकाचा मृत्यू झाला, तर त्याचा मावसभाऊ योगेश बाळू पाटील हा जखमी झाला आहे. महेश हा आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून वडिलांचे यापूर्वीच निधन झाले होते. आता या दुर्घटनेने वृध्दपकाळातील आईचा एकमेव आधारही हिरावल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टेकडी गल्लीत विठ्ठल काशिनाथ पाटील यांच्या धाब्याच्या घरात चाळीसगाव तालुक्यातील लोंढे येथून आलेला महेश आपल्या मावसभावासह राहत होता. शिक्षणासाठी त्याला आईने येथे पाठवले होते. सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास महेश व योगेश घराच्या मागील बाजूस झोपले असताना अचानक मागचा भाग कोसळला. माती व लाकडांच्या ढिगाऱ्याखाली दोघेही दबले. विठ्ठल पाटील व चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ शेजारी नागरिकांच्या मदतीने दोघांनाही बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी महेशला मृत घोषित केले, तर योगेशवर उपचार सुरू आहेत.

महेशचे वडील काही वर्षांपूर्वीच वारले होते. विधवा आईने दोन मुलींसह लोंढे येथे राहात आपल्या एकुलत्या एक मुलाला शिक्षणासाठी पाचोऱ्यात मावसभावाकडे पाठवले होते. आपल्या वार्धक्यात महेशच आधार बनेल, अशी आशा तिची होती. मात्र, नियतीने तिच्याकडून तोही हिरावून घेतल्याने ती कोलमडून पडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला असून, नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.

घटनेची माहिती मिळताच नगरपालिका मुख्याधिकारी मंगेश देवरे, तहसीलदार विजय बनसोडे, पोलीस निरीक्षक राहुल पवार, सहाय्यक निरीक्षक संजय निकम, तलाठी श्रीमती चौधरी आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. माजी नगरसेवक विकास पाटील, किशोर बारवकर, अनिल येवले, भोला पाटील यांनीही धाव घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले.

गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घराच्या भिंतीत पाणी झिरपल्याने ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, अशा घरांची वेळेवर पाहणी न होणे व जुन्या धाब्यांच्या घरांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष हे देखील याला कारणीभूत असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.

Related Posts

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू
क्राईम

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !
क्राईम

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group