
जळगाव मिरर | १७ मे २०२६
धरणगाव तालुक्यातील रेल येथे क्रिकेट खेळताना मृत्यू झालेल्या गणेश नवल पाटील (वय १२, रा. रेल, ता. धरणगाव) याच्या छातीत बॅट मारल्याने त्याला जीव गमवावा लागल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. त्याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पाळधी पोलिस दूरक्षेत्र, धरणगाव पोलिस ठाणे येथे वारंवार चकरा मारूनही न्याय मिळत नाही. त्यामुळे त्यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली, यामध्ये त्यांनी एकुलता एक मुलगा गमावून कुटुंब अजूनही सावरले नसून न्याय मिळावा, अशी विनवनी पोलीस अधीक्षकांकडे केली.
या संदर्भात मयत मुलाचे वडील नवल पाटील यांनी पोलिस अधीक्षकांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. १३ मार्च रोजी रेल येथे क्रिकेट खेळताना गणेश पाटील या १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. मुलगा मैदानावर पडल्याने त्याला जळगावातील खासगी रुग्णालयात आणले होते, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला कोणताही संशय नसल्याने शवविच्छेदन न करता त्याच्या वडिलांनी मृतदेह गावी नेऊन अंत्यसंस्कार केले. मात्र नंतर त्यांनी अधिक चौकशी केली असता गावातीलच एका मुलाने गणेशच्या छातीत बॅट मारली होती व तो घरी पळून गेला होता, अशी माहिती त्यांना मिळाली.
या विषयी यांनी पाळधी पोलिस दूरक्षेत्रा तक्रार देऊन संबंधितांवर कारवाईची मागणी केली. मात्र काहीही कारवाई होत नसल्यान त्यांनी धरणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिल दोन महिन्यांपासून फिराफीर करूनही न्यान मिळत नसल्याने या विषयी नवल पाटील यांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. नवल पाटील हे पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार देण्यासाठी आले त्या वेळ घटना कथन करताना त्यांना अश्रू अनाव झाले. एकुलता एक मुलगा गमावून बसल् असून आता तरी न्याय मिळावा, असे हा जोडत व अश्रू ढाळत ते सर्वांकडे मागण करीत आहेत.






















