जळगाव मिरर | ११ डिसेंबर २०२३
देशभरातील अनेक उच्च शिक्षित तरुण मोठ्या संख्येने बेरोजगारीच्या सावटाखाली असून अनेकांना रोजगार मिळत नसल्याचे देखील दिसत आहे. याच तरुणांना आता नोकरीसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. इस्रो जिथं शास्त्रज्ञांनाच नोकरी लागते. इस्रोमध्ये नोकरीसाठी भरपूर शिक्षण लागत असेल असं अनेकांना वाटतं. तर तसं बिलकुल नाही. तुम्हालाही इस्रोमध्ये नोकरी करायची असेल तर आता तशी सुवर्णसंधी आली आहे. फक्त 12 वी पास असलेल्यांसाठी इस्रोमध्ये भरती निघाली आहे.
सरकारी नोकरी किंबहुना भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोमध्ये नोकरीसाठी इच्छुक असलेल्यांसाठी चांगली बातमी आहे. इस्रोमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली आहे. ISRO ने तंत्रज्ञ-B पदांच्या भरतीसाठी रिक्त जागा प्रसिद्ध केल्या आहेत. ISRO भरती प्रक्रियेद्वारे एकूण 54 पदे भरली जातील. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 9 डिसेंबरपासून सुरू झाली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 18 वर्षे ते 35 वर्षे दरम्यान असावी. त्यानंतरच ते अर्ज करण्यास पात्र मानले जातील. उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेच्या ITI प्रमाणपत्रासह इयत्ता 12 वी उत्तीर्ण केलेली असावी. अर्ज करण्यासाठी, तुम्हाला अर्जाची फी भरावी लागेल. अर्जाची फी ₹ 100 आहे. तथापि, सुरुवातीला सर्व उमेदवारांना प्रक्रिया शुल्क म्हणून प्रति अर्ज ₹ 500 ची एकसमान रक्कम भरावी लागेल. अशा प्रकारे तुम्हाला ISRO मध्ये नोकरी मिळेल.
अर्ज कसा करायचा?
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक उमेदवार ISRO च्या अधिकृत वेबसाइट isro.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. ISRO च्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीतील कामगिरीच्या आधारे निवड केली जाईल.
अर्ज करण्यासाठी इस्रोच्या अधिकृत वेबसाइट isro.gov.in वर जा.