चाळीसगाव : कल्पेश महाले
शहरातील रेस्ट हाऊस येथे मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी जेष्ठ मार्गदर्शक तथा मान्यवर, ज्यांचे सेवा संघाच्या स्थापनेपासून मोलाचा सहभाग ज्यांनी नोंदवला होता अशा मान्यवरांचा सत्कार यावेळी सेवा संघाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला .
त्यात सत्कारार्थी म्हणून श्री एस. पी. पाटील, शिवश्री आर. एस. पाटील, शिवश्री जी.जी.वाघ,शिवश्री मनीष बाविस्कर साहेब, शिवश्री सुधीर आबा पाटील, शिवश्री प्रदीप देशमुख इत्यादी ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला . शिवश्री राकेश बोरसे सर यांनी संघटनेची आजपर्यंतची वाटचाल सांगितली व शिवश्री अ.भी.मोरे सर यांनी मनोगत व्यक्त केले . सूत्रसंचालन श्री दीपक चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवश्री नितीन पाटील यांनी केले.
यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले शिवश्री अरुण पाटील (तालुकाध्यक्ष ) शिवश्री हर्षल कुमार पाटील शिवश्री अशोक भोसले शिवश्री किशोर पाटील शिवश्री प्रा. डॉ.मनोज शितोळे शिवश्री कुणाल पाटील (ता. सचिव) शिवश्री योगेश पाटील, शिवश्री गोरख साळुंखे, शिवश्री.अजित पाटील ,शिवश्री चेतन देशमुख , शिवश्री सुनील चव्हाण, शिवश्री निलेश पाटील, शिवश्री ऍड निळकंठ पाटील, शिवश्री संतोष पाटील , शिवश्री.बंडू पगार इत्यादींनी परिश्रम घेतले.