जळगाव मिरर | २६ जानेवारी २०२४
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि विवेकानंद प्रतिष्ठान संस्थेचे खाशाबा वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरा देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल जळगावातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला आहेआहे. राज्य भरातुन आलेल्या निवडक शाँर्टफिल्म ची मेजवानी जळगावकर रसिकांना मिळणार आहे. या महोत्सवासाठी युवा फिल्म मेकर्स चित्र तपस्वी भालजी पेढारकर चित्र नगरीत दाखल झाले आहे.
सकाळी ८:५० वा.स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ.प्रभा अत्रे सभागृहाचे उद्घाटन होईल. महोत्सवाची ओपनिंग फिल्म “बिसाउ कि मुक रामायण” स. ९:०० वा.डॉ.प्रभा अत्रे सभागृहात प्रदर्शित करण्यात येईल. या नंतर महोत्सवात सहभागी निवडक ६० चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.दुपारी १२ वा.चित्रपट रसिकांसाठी ‘चित्रपट रसग्रहण’ या विषयावर मास्टर क्लास होईल. भारतीय चित्र साधनाचे राष्ट्रीय सचिव तथा चित्रपट अभ्यासक श्री.अतुल गंगवार ,दिल्ली हे या सत्रात मार्गदर्शन करतील.डॉ.जयंत शेवतेकर,संभाजीनगर हे या सत्राचे सुसंवादक असतील.दु ३:००वा. चित्रपट अभ्यासक तरुणांसाठी भोंगा,हलला अश्या गाजलेल्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट दिग्दर्शक श्री.शिवाजी लोटन पाटील,पुणे यांचा ‘कथा निवड व दिग्दर्शन’ या विषयावर मास्टर क्लास होईल.रंगकर्मी विरेंद्र पाटील या सत्राचे सुसंवादक असतील.सायंकाळी ४:३० वा. चित्रतपस्वी भालजी पेंढारकर सभागृहात तिसऱ्या देवगिरी शाँर्टफिल्म फेस्टिव्हल चा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होईल.
या प्रसंगी कुलगुरू डॉ.व्हि.एल.माहेश्वरी, श्री.अशोकभाऊ जैन, डॉ. भरतदादा अमळकर हे प्रमुख अतिथी असतील तर भारतीय चित्र साधनाचे राष्ट्रीय सचिव तथा चित्रपट अभ्यासक श्री.अतुल गंगवार,दिल्ली हे बीजभाषण करतील.सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरभी हांडे उद्घाटक असतील.
शहरातील गुणी कलावंत यावेळी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील.सायंकाळी ७ वा.टुरींग टाकीज या सत्रात लहान मुलांचे भावविश्व समृद्ध करणारा चित्रपट आर्या – द डाँटर आँफ भारत चे प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर निर्माता शरद पाटील व दिग्दर्शक नितीन भास्कर यांचेशी खुला संवाद कार्यक्रम होणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम पूर्ण पणे निःशुल्क असणार आहे. जळगावकर नागरिक यथा चित्रपट रसिकांनी तसेच विद्यार्थी व पालक यांनी या भारतीय चित्रपट कलेच्या महोत्सवात सहभागी होऊन आस्वाद घ्यावा असे आवाहन महोत्सवाचे स्वागताध्यक्ष तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन सदस्य, श्री. राजेंद्र नन्नवरे स्वागत समिती सचिव डॉ.जयेंद्र लेकुरवाळे आयोजन समितीच्या प्रमुख श्रीमती शोभाताई पाटील, कार्याध्यक्ष डॉ.रत्नाकर गोरे ,श्री.विनोद पाटील, प्राचार्य डॉ. किशोर पाठक,श्री.दिनेश ठाकरे,देवगिरी चित्र साधना प्रांत संयोजक श्री.किरण सोहळे,सह संयोजक श्री.विनीत जोशी,श्री.संजय हांडे,प्रा.सुचित्रा लोंढे,श्री.हितेश ब्रिजवासी यांनी केले आहे. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विवेकानंद प्रतिष्ठानचे सर्व मुख्याध्यापक,विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच देवगिरी चित्र साधनाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहे