जळगाव मिरर / २९ एप्रिल २०२३ ।
सध्या मोठ मोठ्या शहरामध्ये जेवणाची मोठी थाळीची मजा अनोखीच आहे. अशीच पुण्यातील एका महिलेने ऑनलाईन हॉटेलची जाहिरात बघत पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलची ४०० रुपयांची थाळी एकावर एक फ्री देण्याची फसवी ऑफर देऊन भामट्याने 2 लाख रुपयांचा गंडा घातला आहे.
पुण्यातील एका महिलेने एका थाळीवर एक थाळी फ्री देणार अशी ती जाहिरात होती. त्या जाहिरातीवर फोन नंबर देखील देण्यात आला होता. त्या नंबरवर त्यांनी संपर्क केला असता केरळ मध्ये असलेल्या या सायबर चोरट्यांनी ऑर्डर करण्यासाठीचे आणि पेमेंट करण्यासाठी लागणारे सर्व डिटेल्स मागितले.
ऑर्डर करण्यासाठीचे आणि पेमेंट करण्यासाठी लागणारे महिलेने सर्व डिटेल्स त्यात भरले. क्रेडिट कार्डची माहिती देखील भरली. त्यानंतर काही वेळात त्यांना बॅंक खात्यातून 2 लाख 2 हजार रुपये दुसऱ्याच्या खात्यात जमा झाल्याचा मेसेज आला. हे पैसे आमिष दाखवलेल्या आरोपीच्या खात्यात जमा झाले होते. त्यांनी लगेच पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.