जळगाव मिरर | ४ सप्टेंबर २०२४
रावेर तालुक्यातील दोघे येथील तापीनदीच्या काठावर आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास झोपडीमध्ये आदिवासी कुटुंबातील मजूर बसले होते. मुसळधार पाऊस सुरु असतांना विजांचा कडकडाट झाला. यात कुटूंबातील पाच ही जण जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये मीराबाई प्रताप जमरे (वय ३०), प्रताप जमरे (वय १३), रेखाबाई रावत (वय ३०), कालू रावत (वय ३०) ज्योती चंद्रसिंग रावत (वय ३२) या व्यक्तींचा समावेश आहे. तलाठी, सर्कल, पोलीस पाटील यांना गावकऱ्यांनी कळविले प्रशासनाने त्यांना रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून व्यक्तींना आता बऱ्हाणपूर येथे सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले. प्रतिष्ठीत नागरीक महेंद्र पाटील यांनी मजुर लोकांची व्यावस्था केली असल्याचे तहसीलदार संजय तायडे यांनी सांगीतले.