जळगाव मिरर | २१ ऑगस्ट २०२४
राज्यातील अनेक शहरात अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच अंबरनाथ येथील रोड रेजची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका माथेफिरू एसयूव्ही चालकाने आपल्या कारने 5 जणांना चिरडले. आधी त्याने एका कारस्वाराला धडक दिली. नंतर एका व्यक्तीला गाडीखाली फरफटत नेले. नंतर त्याने या व्यक्तीला जोरदार धडक दिली. नंतर एसयूव्ही चालकाने दुसऱ्या एका कारला धडक दिली. कारमध्ये काही मुले व एक महिला बसलेली दिसत आहे.
शेवटी काही लोकांनी एसयूव्ही कारवर दगडफेक केली. नंतर ते पीडितेच्या मदतीसाठी धावले. एक काळ्या रंगाच्या कारचा चालक पांढऱ्या कारमागे लागला. ही काळी कार अनेक लोकांना धडकून उलटली. कार चालकाच्या या कृत्याने संपूर्ण रस्त्यावर गोंधळ उडाला. घटनेत दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अंबरनाथ पोलिस घटनास्थळी धावले.
या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून ज्यात दोन गाड्या दिसत आहेत आणि आजूबाजूला काही लोकांची तसेच इतर गाड्यांची गर्दी आहे. दोन चार चाकी गाड्या आहेत ज्यामध्ये एक गाडी काळ्या रंगाची तर दुसरी पांढऱ्या रंगाची आहे. यातील काळ्या रंगाच्या गाडीचा चालक वेगाने येऊन पांढऱ्या रंगाच्या गाडीला घासून पुढे जातो. हा प्रकार अशा वेळी घडतो जेव्हा पांढऱ्या रंगाच्या गाडीतील चालक गाडीचा दरवाजा उघडून बाहेर थांबला होता. त्या ठिकाणी तिघे उभे होते, त्यांना उडवून चालक वेगाने गाडी मीटर पुढे घेऊन जातो. यूटर्न घेऊन तो पुन्हा माघारी येत असताना तेथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीला चालकाने उडवले.
यूटर्न घेऊन कार चालक पुन्हा वेगाने येत पांढऱ्या रंगाच्या गाडीला समोरून वेगाने धडक देतो. यात पांढऱ्या रंगाची गाडी काही अंतर मागे जाते. पांढऱ्या गाडीच्या मागे दुचाकीवर उभे असलेले दोघे जण गाडीच्या चाकाखाली येतात. ते दोघेही फरफटत जातात. या दुचाकीच्या मागे काही अंतरावर उभे असलेल्या अन्य एका दुचाकीवर एक पुरुष आणि महिला होती त्यांना देखील धडक बसते आणि ते दोघेही खाली पडतात. दरम्यान काळ्या रंगाच्या गाडीच्या चालकाने जेव्हा दुसऱ्यांदा धडक दिली तेव्हा गाडीच्या खाली एक लहान मुलगा आला. त्याला नंतर एका व्यक्ती उचलून घेऊन जाताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.