• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 23, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ जून २०२६ 

जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणामध्ये सध्या सुमारे 62 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून हा साठा अंदाजे 7 महिने पुरेल एवढाच आहे. शहरात पूरक जलस्रोत म्हणून 43 विहिरी व 60 बोअरवेल कार्यरत आहेत. भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी आणि उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रभावी नियोजन करण्यासाठी उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी महानगरपालिका प्रशासनास व्यापक उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी विशेषतः रेन वॉटर हार्वेस्टिंग (पावसाचे पाणी संधारण) धोरणाची कठोर अंमलबजावणी करण्यावर भर दिला असून, शहरातील प्रत्येक मोठ्या बांधकाम प्रकल्पात, व्यापारी संकुलात, गृहसंकुलात, शासकीय कार्यालयात, शाळा, महाविद्यालये आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये पावसाचे पाणी संधारण व्यवस्था प्रभावीपणे कार्यान्वित करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

रेन वॉटर हार्वेस्टिंग हा दीर्घकालीन उपाय 
दरवर्षी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी नाल्यांद्वारे वाहून जाते. हे पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविणे आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळणे आवश्यक आहे. यासाठी महानगरपालिका क्षेत्रात रेन वॉटर हार्वेस्टिंगची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी, अशी भूमिका उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी मांडली आहे.

पाणी बचतीसाठी 20 टक्के लक्ष्य
शहरातील एकूण पाणी वापरामध्ये किमान 20 टक्के बचत करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून त्यासाठी गळती नियंत्रण, अनधिकृत वापरावर कारवाई, पुनर्वापर आणि जनजागृती यावर विशेष भर दिला जाणार आहे.

कार वॉश व्यवसायांवर नियंत्रणाची सूचना
उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी प्रशासनास स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, पिण्याच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करणाऱ्या नवीन कार वॉश व्यवसायांना किंवा तत्सम व्यावसायिक वापरासाठी पिण्याच्या पाण्याचा अनिर्बंध वापर होईल अशा प्रकल्पांना परवानगी देताना विशेष दक्षता घ्यावी. अशा व्यवसायांनी पुनर्वापरित पाणी किंवा प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे.

पाणी चोरी आणि गळतीवर कठोर कारवाई
शहरातील सर्व जलवाहिन्यांचे सर्वेक्षण करून गळतीग्रस्त भागांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. अनधिकृत कनेक्शन, बायपास लाईन, मीटरमध्ये छेडछाड तसेच पाणी चोरी करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

RO वेस्ट वॉटरचा पुनर्वापर
घरगुती व व्यावसायिक स्तरावर RO वेस्ट वॉटरचा वापर साफसफाई, फ्लशिंग, बागकाम व इतर दुय्यम कामांसाठी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जनजागृती मोहिमेला चालना
“माझे पाणी – माझा अभिमान” या अभियानांतर्गत शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, व्यापारी संघटना व नागरिकांच्या सहभागातून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांचे आवाहन
“वाघूर धरणात सध्या समाधानकारक पाणीसाठा असला तरी भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन आजपासूनच प्रत्येक जळगावकराने पाणी बचतीची सवय लावणे आवश्यक आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याचा पुनर्वापर आणि अपव्यय रोखणे ही काळाची गरज आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्या संयुक्त सहभागातून जळगाव शहर जलसुरक्षित बनवूया,” असे आवाहन उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी केले

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group