
जळगाव मिरर | २६ जून २०२५
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेतील सात विद्यार्थ्यांची परिसर मुलाखतीमध्ये निवड झाली असून कुलगुरू प्रा व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते त्यांना आज नियुक्तीपत्रे देण्यात आली.
विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाअंतर्गत युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे बी. टेक केमिकल इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांसाठी कुमार मेटल इंडस्ट्रीज प्रा. लि. मुंबई व सुप्रीम पेट्रोकेम लि. रायगड या कंपन्यांतर्फे परिसर मुलाखतीचे युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथील सेमिनार हॉल येथे आयोजन करण्यात आले होते.
या परिसर मुलाखतीतून कुमार मेटल इंडस्ट्रीज प्रा. लिमिटेड, मुंबई या कंपनीत निकिता चौधरी आणि निकिता कोळी या विद्यार्थिनींची निवड करण्यात आली आहे. तर सुप्रीम पेट्रोकेम. लिमिटेड, रायगड या कंपनीत प्रसाद ठाकूर, प्रशांत पाटील, राम साखरे आणि जयेश पाटील आणि प्लास्टिक टेक्नॉलॉजीच्या अमित कोळी अशा एकूण ७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.




















