
जळगाव मिरर । २७ ऑक्टोबर २०२२
शिंदे गटातील अल्पावधीतच फेमस झालेले आ.शहाजीबापू पाटील यांनी काही दिवसापूर्वी आपल्या बायकोला साडी घ्यायलाही पैसे नव्हते, असं वक्तव्य केले होते त्यावर पलटवार आ.एकनाथराव खडसेंनी केला आहे.
खडसे म्हणाले की, “बायकोला साडी घेण्यासाठीही माझ्याकडे पैसे नाहीत असे म्हणणारा मर्द कसला” बायकोला साडी घ्यायला पैसे आपल्याजवळ नव्हते, आपली पूर्वीची परिस्थिती सांगताना शहाजीबापू पाटलांनी हे वक्तव्य केले होते.
पुढे खडसे म्हणाले की, “शहाजीबापूंनी त्यांची पूर्वीची स्थिती सांगताना म्हटले की, त्यावेळी शरद पवारांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही. बायकोलाही साडी घ्यायला पैसे नव्हते. हे वक्तव्य शहाजीबापूंनी कदाचित गमतीने किंवा उद्वेगाने केले असेल. आपल्या बायकोलाही साडी घेऊ शकत नाही तो मर्द कसला? मात्र शहाजी बापूंनी जे म्हटले आहे, हे कोणत्या हेतूने म्हटले हे मला माहिती नाही. शहाजी बापूंची परिस्थिती आमदार झाल्यापासून सुधारली आहे. त्यामुळे त्यांना आता कोणाकडे आशेने बघण्याची आवश्यकता नाही.”




















