जळगाव मिरर / २८ ऑक्टोबर २०२२
हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि रुक्ष होते. यामुळे त्वचेला खाज, त्वचेवर रॅश येते. त्यामुळे एक प्रकारचं इरिटेशन होत असतं. म्हणूनच त्वचेची काळजी घेणं फार आवश्यक असतं. ज्यामुळे थंडीतही त्वचा मुलायम राहण्यास मदत होते. असाच फायदा आंघोळीच्या पाण्यात या तेलाचे दोन थेंब टाकल्याने होतो.
आंघोळीच्या पाण्यात घाला ऑलिव्ह तेलाचे दोन थेंब
हिवाळ्यात आंघोळ करताना पाण्याच्या बादलीत २ थेंब ऑलिव्ह ऑइल टाका. पाण्यात तेल मिक्स करा. यामुळे तेल तुमच्या त्वचेला हायट्रेट ठेवते. ज्यामुळे त्वचा चमकदार आणि कोमल बनते. ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन इ असते. पाण्यात घालून आंघोळ केल्याने चमक वाढते. व्हिटॅमिन इ, पालीफेनोल आणि सायटोस्टेरॉल पेशी नष्ट होण्यापासून वाचवतात. अँटीऑक्सिडंट त्वचेचा सॉफ्टनेस कायम टिकवतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
