
जळगाव मिरर । २९ ऑक्टोबर २०२२
अल्पवयीन तरुणाचा चाळीसगाव तालुक्यातील वालझिरी येथील नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू झाला ही घटना गुरुवार, 27 ऑक्टोबर रोजी घडली. मयताचे नाव राहुल सुरेश चौधरी (17, श्रीराम नगर, सिंधी कॉलनी, पाचोरा) असे आहे.
राहुल हा भाऊबीज सणासाठी बहिणीकडे गावी आला होता. गुरुवार, २७ रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील वालझिरी येथे आयोजित नवसाच्या कार्यक्रमात आल्यानंतर नदीपात्राजवळ हात पाय धुण्यासाठी गेला असता, पाय घसरून नदीपात्रात पडला. सोबतच्या मुलांनी व परीवारातील सदस्यांनी तत्काळ उपस्थितांच्या मदतीने राहुल यास पाण्यातून बाहेर काढत चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित करताच कुटूंबियांनी टाहो फोडला. मयत राहुल चौधरी या तरुणाच्या पश्चात आई, बहिण, मेहुणे असा परीवार आहे. भाऊबीज सणात अशी घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.




















