
जळगाव मिरर । २९ ऑक्टोबर २०२२
जळगाव शहरातील श्रीराम चौक येथील एका परिसरातून जबरी घरफोडी करीत सोने व रोकड रक्कम लांबविल्याची घटना घडली आहे, या प्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील श्रीराम चौकातील निसर्ग कॉलनीतील रहिवासी दिपाली सतीश सोनवणे(वय ३३) हे वास्तव्यास आहे. दि २७ ते २८ रोजीच्या दरम्यान अनोळखीनी राहत्या घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागीने व रोकड रक्कम तब्बल एकूण १ लाख २० हजार रुपये लांबविल्याची घटना उघडकीस आल्यानंतर फिर्यादी दिपाली सतीश सोनवणे यांनी शनीपेठ पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास स.फौ.किरण पाठक हे करीत आहेत.




















