
जळगाव मिरर / १ नोव्हेंबर २०२२
धरणगाव शहरात आज दि १ रोजी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची जोरदार सभा सुरु असताना उपस्थित कार्यकर्ते व नेत्याच्या मोबाईलसह पाकिट मारण्याची चोरटयांनी जिल्ह्यातील परंपरा कायम ठेवली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे धरणगावातील मुख्य चौकात स्वागतावेळी एका पदाधिकाऱ्याचा पाकिटाची चोरी तर कार्यकर्ते भाषण ऐकण्यात मंत्रमुग्ध असताना त्या कार्यकर्त्याच्या मोबाईलची चोरी झाल्याची घटना या सभेमध्ये झाली आहे. सभेला दांडगा पोलीस बंदोबस्त असतानाही चोरट्याची हिम्मत वाढली आहे. तर चक्क सभेत मोठा पदाधिकारी व जळगावहून गेलेले ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांच्या वन प्लस मोबाईलची चोरी झाली आहे. हा मोबाईल ४० हजार रुपये किमतीचा होता, सभा संपल्यानंतर हा कार्यकर्ते पोलीस स्थानकात जाऊन चोरीची तक्रार करणार असल्याची माहिती या कार्यकर्त्याने यावेळी दिली.




















