
जळगाव मिरर / ३ नोव्हेंबर २०२२
घरात दुचाकी असो कि चारचाकी घरातील प्रमुख हा नेहमी परिवारातील महिलांना चालविण्याचे शिकवून ठेवत असतो, पण पती पत्नीला चारचाकी शिकवत असताना असं काही होईल असा त्यांना अंदाज सुद्धा आला नाही तर या दुर्दैवी घटना घडली आहे, यात महिलेचा व पाचवीत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावाराजा येथील रामनगरमध्ये शिक्षक अमोल मुरकुटे हे आपली पत्नी स्वाती मुरकुटे यांना कार शिकवत होते. मुरकुटे दाम्पत्यासोबत त्यांची पाचवी इयत्तेत शिकणारी मुलगी सिद्धी मुरकुटे ही देखील होती. दरम्यान पत्नीला कार शिकवत असताना चिखली रोडवर ताबा सुटल्याने कार थेट ७० फुट खोल विहिरीमध्ये कोसळली. या अपघातानंतर अमोल मुरकुटे खिडकीमधून कसेबसे बाहेर आले. मात्र स्वाती मुरकुटे व मुलगी सिद्धी मुरकुटे यांचा मात्र पाण्यामध्येच मृत्यू झाला.
जखमी अवस्थेतील अमोल मुरकुटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून स्वाती मुरकुटे व सिद्धी मुरकुटे यांचा मृतदेह शोधण्यात बाहेर काढण्यात येत असून अग्निशमन दलाची गाडी तसंच पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे.




















