
जळगाव मिरर / ९ नोव्हेंबर २०२२
महामार्गावर तुम्ही आता पर्यंत चोरीच्या घटना पाहिल्या असतील तर छोट्या मोठ्या चोऱ्या होत असतात, पण हि चोरीची घटना इतकी मोठी आहे. नाशिक महामार्गावर लुटीचा थरार पहायला मिळाला आहे. चोरट्यांनी बिअरच्या बॉटल्स घेवून जाणारा कंटेनर लुटला आहे. बिअर बॉटलचे 2200 बॉक्ससह जवळपास 63 चोरट्यांनी अगदी फिल्मी स्टाईलने ही लुट केली आहे. यामुळे या बियर चोरीची नाशिकमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. औरंगाबाद येथे असलेल्या किंगफिशर कंपनीचा एक कंटेनर बियरच्या बॉटल घेऊन निघाला होता. या कंटेनकर मध्ये बिअर बॉटलचे 2200 बॉक्स होते.
बिअरचे बॉक्स घेऊन जाणारा कंटेनर नाशिकमधील घोटी येथे पोहचताच चोरट्यांनी डाव साधला. ड्रायव्हरला बेशुद्ध करून 43 लाख 30 हजार रुपये किमतीची बिअर आणि कंटेनर असा 63 लाख 29 हजार 856 रुपयाचा माल जबरदस्ती लुटला.
याना केली अटक
गुन्हा नाशिक ग्रामीण पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. एका मोठ्या टोळक्याने हे कृत्य केले आहे. सर्व आरोपी 20 ते 25 वयोगटातील आहेत. गुड्डू, निलेश, सरदार, पप्पू, विकी, जिसान आणि इतर काही अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दहा जणांना अटक केली आहे.
असा लुटला कंटेनर
आरोपींनी रस्त्यातच हा कंटेनर अडवला. यानंतर आरोपींनी कंटेनर ड्रायव्हरचे तोंड रुमालाने दाबुन त्याला बेशुध्द केले. यानंतर कंटेनर आणि बियरचे बॉक्स आपल्या ताब्यात घेत आरोपींनी ड्रायव्हरला नाशिकच्या एका बिल्डींगमध्ये डांबुन ठेवले.





















