
जळगाव मिरर / १४ नोव्हेंबर २०२२
फुला मुलांचे आवडते भारताचे पहिले पंतप्रधान व भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे म्हणजेच बाल दिनाचे औचित्य साधून नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेमार्फत हरी विठ्ठल नगर येथील भिल्ल वस्ती मधील लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
पंडित नेहरू यांना लहान मुलं ही खूप आवडत असत मुलंही देवावरची फुलं असं ते नेहमी म्हणायचे आज बाल दिनाच्या निमित्ताने खाऊ वाटप करताना लहान मुलांचे आनंदी चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. याप्रसंगी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सौ मनिषा पाटील, नूतन तास खेडकर ,जनमत प्रतिष्ठानचे पंकज नाले, नेहा जगताप, माधुरी शिंपी, राधिका पाटील, कोमल वाघ, हर्षाली पाटील उपस्थित होत्या.




















