जळगाव मिरर / १४ नोव्हेंबर २०२२
रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान माणसाने आयुष्यात येऊन स्वच्छंदी रक्तदान करून लाडके देवाचे व्हावे हे ब्रीदवाक्य येथील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार आणि भोकर येथील तापीकाच्या गावातील गरीब शेतकऱ्याचे घरी जन्मास आलेले मदन रामनाथ लाठी यांचे आहे.

माजी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांचा एक ऑक्टोबर 2021 रोजी 76 वा वाढदिवस आणि मदन लाठी यांचा 76 वे रक्तदान हा एक योगायोगच म्हणावा लागेल. त्यानंतर 2 जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन एक मे महाराष्ट्र दिवस 15 ऑगस्ट आजादी का महोत्सव आणि 14 नोव्हेंबर रोजी त्यांनी आपले ८२ वे रक्तदान पूर्ण केले.
त्यांच्या या उपक्रमाबद्दल महाराष्ट्र माहेश्वरी युवा संघटनेने त्यांना करोना योद्धा म्हणून सन्मानपत्र दिले आहे. त्यांचा विविध ठिकाणी सत्कार देखील करण्यात आला आहे. त्यात पिंपरी चिंचवड येथील माहेश्वरी समाज, न्यू सांगवी येथील माहेश्वरी समाज, न्यू सांगवी येथील खानदेश मित्र मंडळ, पिंपळे गुरव येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक श्री श्याम जगताप, आणि ते ज्या सोसायटीत राहत होते त्या सोसायटीत त्यांच्या वार्षिक सभेत आणि मागच्या रविवारी जळगाव येथे लाठी कुलस्वामिनी मंदिरात त्यांच्या वार्षिक सभेत त्यांचा सत्कार करण्यात आला. मदनलाठी यांच्या रक्तदानाच्या उपक्रमामध्ये उपक्रमाबद्दल आपल्या देशाचे तत्कालीन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी त्यांचे कौतुक केले आणि लोकांना या कार्यासाठी प्रेरित करत राहा असा सल्ला मेलद्वारे देण्यात आला. मदन लाठीच्या या रक्तदानाच्या उपक्रमाबरोबरच त्यांचे सामाजिक कार्य नियमित सुरू असते.




















