जळगाव मिरर । १५ नोव्हेबर २०२२
जागतिक बाजारपेठमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत प्रंचड वाढ झाली असली तरी देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर कोणताही बदल झालेला नाही. सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी सकाळी पेट्रोल-डिझेलचे देशातील नवे जाहीर केले आहेत. आजही देशातील चारही महानगरांमध्ये तेलाच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही.
जर कच्च्या तेलाबद्दल बोलायचं झालं तर गेल्या 24 तासांत त्याच्या किंमतीही बदलल्या आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 93.14 डॉलरपर्यंत वाढली आहे. तसेच, डब्ल्यूटीआयचा दर एका उडीसह प्रति बॅरल 85.26 डॉलरवर विकलं जात आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीतील शेवटचा बदल 22 मे रोजी झाला होता. पाच महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. केंद्र सरकारनं 22 मे रोजी उत्पादन शुल्क कमी केलं होतं. त्यामुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झालं होतं. यानंतर महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर नव्या सरकारनं पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता.
दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) दररोज सकाळी 6 वाजता क्रूडच्या किमतीवर आधारित तेलाचे दर जारी करतात. पेट्रोल किंवा डिझेलच्या दरांत काही बदल झाल्यास त्याची अंमलबजावणी त्याच वेळी केली जाते. वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्हॅटचे दर वेगवेगळे असल्यानं देशातील प्रत्येक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे असतात.