
अमळनेर : प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत एरंडोल विभाग क्रीडा समिती द्वारा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,चोपडा आयोजित आंतर-महाविद्यालय मैदानी स्पर्धेत प्रताप महाविद्यालने सांघिक विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत १६ महाविद्यालयातील खेळाडू सहभागी झाले होते. अतिशय प्रतिष्ठेची असलेल्या मैदानी स्पर्धेतील सांघिक विजेतेपद पुरुष आणि महिला या दोन्ही विभागात प्रताप’ महाविद्यालयास (स्वायत्त), अमळनेर यांना या वर्षी मिळाले आहे. मागील वर्षी देखिल प्रताप महाविद्यालयाने पुरुष गटात सर्व साधारण विजेतेपद मिळविले होते. या यशा बद्दल खा. शि.मंडळाचे कार्याध्यक्ष आणि प्राध्यापक वृध्द यांनी कौतुक केले आहे.




















