जळगाव मिरर । २६ नोव्हेबर २०२२
वेगवेगळ्या भागात कुठे गव्हाची पोळी, कुठे मैद्याची रोटी, कुठे गव्हाची बाटी तर कुठे तांदळाचे डोसे केले जातात. भाजी पोळी हा नेहमीचा आपला आहार आहे. विशेषत: महाराष्ट्रात सुरवातीला पोळीच्या जागी भाकरी केली जायची पण बदलत्या जीवनमानानुसार भाकरीची जागा पोळीने घेतली. तरीसुद्धा ग्रामीण भागात आवडीने ज्वाकी बाजरीची भाकरी खाल्ली जाते.
पण तुम्हाला माहितीये का पोळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का की भाकरी खाणे? चला तर जाणून घ्या. ज्वारी बाजरी पासून बनणाऱ्या भाकरी पोळी पेक्षा अधिक पौष्टिक असतात. मुळात गहू पित्तकरी असून ज्वारी-बाजरीमध्ये क्षारही असतात त्यामुळे हिवाळ्यात आरोग्यासाठी भाकरी अधिक चांगले असतात. शिवाय चपातीमध्ये साखरेचे प्रमाण ज्वारी-बाजरी पेक्षा जास्त असते म्हणून मधुमेहाच्या रूग्णांना डॉक्टर चपाती ऐवजी भाकरी खाण्याचा सल्ला देतात.
तीन प्रकारच्या भाकरी खाल्ल्या जातात. बाजरी, ज्वारी आणि नाचणी.
बाजरीमध्ये ओमेगा-3 नावाचा घटक असतो यामुळे हार्टशी संबंधित आजार, मधुमेह संधिवात आजार दूर होतात. बाजरीची भाकरी खाल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.
ज्वारीचे भाकर खाल्ल्याने कॅन्सरचा धोका कमी होण्याची शक्यता असते. ज्वारीची भाकर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करते.
नाचणीच्या भाकरीत कॅल्शियम आणि प्रोटिनचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होतात. रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे नाचणीची भाकरीने आवर्जून खावी.
