जळगाव मिरर । ५ डिसेंबर २०२२
यंदाच्या दिवाळीत सोने, चांदीचे दर आताच्या दरापेक्षा फारच कमी होते. त्यामुळे सोने खरेदीसाठी व गुंतवणूकदारांसाठी मोठी फायद्याची ठरल्याचे चित्र दिसत आहे. महिन्याभरापूर्वी सोने, चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात प्रतितोळा तीन हजारांची, तर चांदीच्या दरात प्रतिकिलो साडेपाच हजारांची वाढ झाली आहे. आगामी काळात सोन्याचे दर प्रतितोळा साठ हजारांचा टप्पा गाठेल, असा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तविला आहे. आज सोने ५३ हजार ८०० प्रतितोळा, तर चांदी ६५ हजारांवर पोचली आहे.
गेल्या महिन्यात सुरू झालेल्या लग्नसराईमुळे सोन्याला प्रचंड मागणी होत आहे. सुवर्ण व्यावसायिकांच्या अनुभवानुसार सोने, चांदीच्या दरात हवीतशी भाववाढ होत नव्हती. आता चांगला दर सोने, चांदीला मिळाला आहे. दिवाळीत सोने, चांदीचा दर कायम होता. सोन्याचा दर प्रतितोळा ५१ हजार, तर चांदीचा प्रतिकिलो ५९ हजार होता. तोच दर पाडवा, भाऊबीजेनंतर २८ ऑक्टोबरपर्यंत कायम होता. २९ ऑक्टोबरला सोन्याच्या दरात दोनशे, तर चांदीच्या दरात पाचशेची घट झाली होती. ४ नोव्हेंबरला सोने प्रतितोळा ५० हजार ८००, तर चांदी ५९ हजार ५०० (जीएसटीविना) होते. १८ नोव्हेंबरला सोन्याचे दर प्रतितोळा ५२ हजार ५००, तर चांदी ६२ हजारांपर्यंत (जीएसटी) पोचले होते.
२५ नोव्हेंबरला चांदीत तब्बल दीड हजारांची वाढ होऊन चांदी ६३ हजार ५०० पर्यंत पोचली होती. १ डिसेंबरपासूनही सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. यादिवशी सोने ५३ हजारांवर, तर चांदी ६४ हजारांवर पोचली. खालील दर एका वृत्तवाहिनीने दिलेले आहे.
काही दिवसांतील दर असे (जीएसटीविना)
तारीख — सोने प्रतितोळा — चांदी प्रतिकिलो
४ नोव्हेंबर–५० हजार ८०० — ५९ हजार ५००
१८ नोव्हेंबर — ५२ हजार ५०० — ६२ हजार
२२ नोव्हेंबर–५२ हजार ५००–६३ हजार
२५ नोव्हेंबर–५२ हजार ८००–६२ हजार
१ डिसेंबर–५३ हजार–६४ हजार
४ डिसेंबर –५३ हजार ८००–६५ हजार