
जळगाव मिरर । ६ डिसेंबर २०२२
महानिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न, महामानव, घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना शहरातील जायंट्स ग्रुप ऑफ तेजस्विनी जळगावतर्फे ६ डिसेंबर रोजी सकाळी ठीक ७ वाजता रेल्वे स्टेशन जळगाव येथे आदरांजली अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष सौ मनिषा पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार स्पष्ट केले व आचरणात आणण्याचा संकल्प सर्वांनी करावा असे सांगितले तर अध्यक्ष ज्योती राणे यांनी संविधान व घटनेचे महत्त्व सांगितले नेहा जगताप यांनी त्यांचें गुणवर्णन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रेणुका हिंगू यांनी केलें कार्यक्रमास नूतन तासखेडकर यांचे मार्गदर्शन लाभले.आभार किमया पाटील यांनी मानले.या प्रसंगी सौ मनिषा पाटील,ज्योती राणे,किमया पाटील ,नुतन तासखेडकर ,रेणुका हींगू, शशी शर्मा, योगिता बाविस्कर,नेहा जगताप, संगिता चौधरी ,किरण जोशी या सह सर्व जायंटस ग्रुप ऑफ तेजस्विनीच्या महिला भगिनी व पदाधिकारी उपस्थित होत्या.





















