
जळगाव मिरर । २३ डिसेंबर २०२२
भारतीय जनता पार्टीच्या स्वावलंबी भारत योजनेच्या देवगिरी प्रांत व उत्तर महाराष्ट्रच्यापदी अरुण बोरोले यांची निवड करण्यात आली असून नुकतिच पहिली बैठक स्वावलंबी भारत योजनेचे प्रमुख व भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्लीत संपन्न झाली.
अरूण बोरोले हे उद्योजक असून MIDC जळगाव मध्ये त्यांचा उद्योग असून गेली 28 वर्षापासून ते भाजपचे काम करीत आहेत.या कालखंडात त्यांनी भाजपा उद्योग आघाडी जिल्हा व प्रदेश स्तरावर, कार्य व जबाबदारी सांभाळली आहे. जळगाव जिल्हा महानगर अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम सर्वश्रुत आहे. ते कुशल संघटक असून त्यांचे या निवडीने सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.सर्वांना बरोबर घेवून पार्टीचे काम करू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.व खऱ्या अर्थाने स्वावलंबी भारत अभियान यशस्वी करू असे ते म्हणाले. या निवडीबद्दल जिल्ह्याचे नेते गिरिश महाजन, संघटन मंत्री रवि अनासपुरे, खा.उन्मेषदादा पाटील, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे डॉ राजेन्द्र फडके जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे, आ.संजय सावकारे, आ.मंगेश चव्हाण आ.चंदूभाई पटेल मा.आ.स्मिता वाघ महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी व सर्व पदाधिकारी व उद्योग आघाडीतर्फे त्याचे अभिनंदन व शुभेछ्या दिल्या आहेत.




















