
जळगाव मिरर । २३ डिसेंबर २०२२
चाळीसगाव शहरातील बस स्थानकावर एका ६१ वर्षीय वृद्ध महिलेचे सोन्याची पोत लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव तालुक्यातील न्हावे येथील ६१ वर्षीय वृद्ध महिला देवकाबाई सूर्यभान शेलार या आपल्या गावी जाण्यासाठी बस स्थानकात न्हावे येथे जाणाऱ्या बस मध्ये दि २१ रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास बसत असतांना अनोखी व्यक्तीने गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली हे मंगळसूत्र ३५ हजार रुपये किमतीचे होते. या प्रकरणी महिलेने तत्काळ चाळीसगाव शहर पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोना.राहुल सोनवणे हे करीत आहेत.




















