
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर शहरातील मुख्य रस्त्यावर असलेले राष्ट्रीय संताच्या प्रतिमेवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याचे पडसाद शहरात उमटले. त्यानंतर एका समाजाने नाराजी व संताप व्यक्त केला. तर काही नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले.
यावेळी शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे तालुका प्रमुख श्रीकांत पाटील, शहर प्रमुख सूरज परदेशी, अनंत निकम, उमेश वाल्हे, रवींद्र जाधव, अविनाश जाधव, विनोद जाधव, अमृत जाधव आदींनी आंदोलन केल्याने वाहतूक खोळंबली होती. घटनास्थळी पोलिस नाईक रवी पाटील, दीपक माळी, सिद्धांत शिसोदे, मिलिंद भामरे यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांची समजूत घातली. यात रवींद्र जाधव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंद आहे. आंदोलकांनी २४ तासात त्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी देखील यावेळी पोलीस प्रशासनाला केली आहे.




















