
जळगाव मिरर । २४ डिसेंबर २०२२
एकाच तालुक्यातील जिवलग मित्र जळगावात आपल्या मित्राची भेट घेवून घरी जात असतानाच शहरातील गुजराल पेट्रोल पंपाजवळील उड्डाणपूलावर दुचाकी दुभाजकावर आदळून मयूर विठ्ठल लंके-साळूंखे (वय-19, रा. पथराड, ता. धरणगाव) व दीपक समाधान पाटील (वय-21, रा. बोरखेडा, ता. धरणगाव) हे दोघ मित्र चारचाकी वाहनाच्या खाली येवून ठार झाले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगावातील मित्राला भेटून मयूर लंके- साळुंखे आणि दीपक पाटील हे दुचाकीने आपल्या गावाकडे निघाले होतेे. शहरातील गुजराल पेट्रोल पंपाजवळील उड्डाणपूलावरील दुभाजकावर त्यांची दुचाकी आदळली. परंतु दोघ तरुण सुसाट वेगाने असल्याने ते दुभाजावर लावलेले फायबरचे कठडे तोडून दुसर्या बाजूला रस्त्यावर फेकले गेले. यावेळी त्याठिकाणाहून येणार्या चारचाकी वाहनाची खाली दोघ तरुण आल्याने मयूर याचा जागीच मृत्यू झाला तर दीपक हा गंभीर जखमी झाल्यानंतर त्याचाही दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुपारी जिल्हा सामान्य रूग्णालयात नातेवाईकांसह ग्रामस्थांची प्रचंड गर्दी झाली होती.




















