
जळगाव मिरर / २६ डिसेंबर २०२२
अमळनेर येथे झालेल्या राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या कोनशिलेच्या प्रतिमेस अज्ञात समजकंटकाने विटंबन केली असून सदरील अज्ञात इसमांला त्वरित अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज पारोळा तालुका व शहर परीट धोबी समाजातर्फे पारोळा तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे कि, अमळनेर येथील बस स्टैंड परिसरात असलेल्या राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या कोनशिला प्रतिमेस अज्ञात समाजकंटकाने दगड मारून विटंबन केलेमुळे सदरील अज्ञात इसमांला त्वरित अटक करण्यात यावी परिट धोबी समाजाचे आराध्य दैवत राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे जळगांव जिल्ह्यातील अमळनेर येथील बस स्टैंड परिसरात असलेल्या राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या कोनशिला प्रतिमेस अज्ञात समजकंटकाने दगड मारून विटंबन केलेली आहे. यामुळे समस्त परिट धोबी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे. सदरील अज्ञात इसमांचा शोध घेवून त्यांचेवर कडक कारवाई करण्यात यावी. तर सदर ठिकण सीसीटीव्ही कॅमेरे असल्यास त्याचा तपासकामी उपयोग करावा. अशा आशयाचे निवेदन दिले आहे. संबंधितावर कारवाई न झाल्यास समाजातर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. प्रशासनाने तातडीने याची दखल घेवून कारवाई करावी असे नम्र निवेदन करण्यात येत आहे.
यांनी दिले निवेदन
तालुका अध्यक्ष विलास वाघ शहराध्यक्ष विजय वाघ, संभाजी देवरे सर, ईश्वर धोबी सर, सुरेश खैरनार, बापू एसी, दिलीप खैरनार, महेंद्र खैरनार, साहेबराव वाघ, महेश वाघ, विलास खैरनार, शुभम देवरे, अनिल वाघ, जयेश खैरनार, विनोद खैरनार, नरेंद्र वाघ, योगेश वाघ, तुषार वाघ, मनोज वाघ, सतीश वाघ, महेंद्र एसी, हर्षल वाघ यांची उपस्थिती होती.




















