
जळगाव मिरर । २७ डिसेंबर २०२२
राज्यातील अपघाताची मालिका संपण्याचे नावच घेत नाही आहे. काही दिवसापूर्वी नाशिक येथे महामार्गावर बसचा अपघात झाला होता त्यानंतर छोटे मोठे अपघात सुरूच असतांना आज मालेगाव तालुक्यातील दाभाडीहून जाताना सप्तशृंगी गडावरील दरडोई कर वसुली नाक्यापासून पाचशे मीटर अंतरावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची पिकअप पलटी होवून 32 प्रवासी जखमी झाले असुन चार भाविकांवर नांदुरी येथे, उपचार सुरु आहेत तर उर्वरीत यांचेवर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.
मंगळवार देवीचा वार अशी मान्यता असल्याने मंगळवारी सप्तशृंगीरणी हजारो भाविक लीन होतात.आज मंगळवारी सकाळच्या,सुमारास दाभाडी येथील बंडु गांगुर्डे याच्या पिकअप क्रमांक MH 18- BZ -8167 या क्रमांकाच्या पिकअप मधुन सदर भाविक सप्तशृंग गडावर दर्शनासाठी जात होते नांदुरी ते सप्तशृंगगड हे अंतर दहा किलोमीटर असुन सप्तशृंगीचे मंदिर अवघे एक किलोमीटर अंतरावर असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व सदर पिकअप पलटल्याने भाविकांनी आक्रोश केला.
गडावरील नागरीक ,सामाजिक कार्यकर्ते व पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली काही जखमीना नांदुरी येथे दाखल केले. तर उर्वरीत यांना रुग्णवाहिकेद्वारे, वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान मालवाहु वाहनामधे प्रवासी भाविक एवढ्या संख्येने आसताना नांदुरी येथील तपासणी करणारांनी हे वाहन सोडले कसे दरम्यान वणीग्रामीण रुग्णालयात 23 जखामीना दाखल केले आहे.





















