
जळगाव मिरर । २८ डिसेंबर २०२२
जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळू माफिया सक्रीय आहेत. सुट्टीहून परतलेले जिल्हाधिकारी अमन मित्तल हे पुन्हा सक्रीय होत थेट तहसीलदार यांच्या पथकाला घेत नदीपात्रात पोहचले असता वाळूमाफिया नदीपात्रातून पसार होण्यात यशस्वी जरी झाले असले तरी जिल्हाधिकारी मित्तल यांनी एक अनधिकृत वाहतूक करणारे डंपर ताब्यात घेतले आहे.
जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्यासह महसूल विभागाचे काही कर्मचारीदेखील या पथकात होते. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांनी आव्हाणे, खेडी या भागात पाहणी केली. मात्र, त्यांच्या येण्याच्या आगोदरच वाळू माफियांना काणकूण लागल्याने नदीपात्रातील सर्व वाहने आधीच पसार झाली होती. खेडी, आव्हाणे व बायपासलगत पाहणी केल्यानंतर शिव कॉलनी स्टॉपजवळ वाळूने भरलेला एक डंपर जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने पकडला. जिल्हाधिकाऱ्यांनी हा डंपर पकडताच, चालकाने डंपर सोडून पळ काढला. त्याठिकाणी तहसीलदार नामदेव पाटील यांच्या पथकाला बोलावून तो डंपर ताब्यात घेण्यात आला आहे.




















