
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
शहरातील महिलांना नेहमीच सुरु असलेले कामाचे नियोजन एक दिवस वेळात वेळ काढून आरोग्यासाठी ‘चलना ही जिंदगी है’ ब्रीद वाक्य घेत अमळनेर महिला मंच ट्रस्टने ‘वॉकेथॉन’ स्पर्धेचे आयोजन केले आहे.
अमळनेर महिला मंच ट्रस्ट आयोजित विविध स्पर्धांची मेजवानी महिलासाठी दिली आहे. हि ‘वॉकेथॉन’ स्पर्धा दि २ जानेवारी २०२३ रोजी होत आहे.यामध्ये “वॉकेथॉन म्हणजेच चालण्याची स्पर्धा चालण्याचे फायदे ज्यांना माहिती आहेत अशा आणि ज्यांना माहिती नाही अशांनी ते फायदे जाणून घेणाऱ्या सर्व महिला मैत्रिणींना यात भाग घ्यावा अशी मंचतर्फे आवाहन करण्यात आले आहे. ‘वॉकेथॉन’चा मार्ग भद्रा प्रतिक मॉलपासून मारवड रोड येथे होणार आहे. तर पहिला गट:वयोमर्यादा:25 ते 40 चालण्याचे अंतर जाऊन येऊन 5 किलोमीटर, दुसरा गट:वयोमर्यादा:41 ते 55 चालण्याचे अंतर 4 किलोमीटर, तिसरा गट: वयोमर्यादा:55 ते पुढील, चालण्याचे अंतर:3 किलोमीटर, स्पर्धेसाठी आधारकार्ड आवश्यक असेल तर प्रवेश फी रुपये : 50 स्पर्धेची तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन अमळनेर महिला मंच ट्रस्टचे शीला पाटील 9422409959, उज्वला शिरोडे 8669046494, वनश्री अमृतकार 9420080770 यांनी केले आहे. या स्पर्धेसाठी सहभागासाठी नोदणी दि ३० डिसेंबर हि अंतिम दिनाक असेल.




















