
जळगाव मिरर । ३१ डिसेंबर २०२२
शहरातील एका परिसरातील बंद घर फोडत चोरट्यांनी ७० हजाराची चोरी केली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की शहरातील ओम शांतीनगर परिसरातील रहिवासी विजय रामदास तायडे यांच्या घरी अनोळखी चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करीत ६० हजार रुपयांची रोकड तर १० हजार रुपयाचा किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना दिनांक २५ रोजी घडली आहे. याप्रकरणी अनोळखी चोरट्यांवर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहे का सुशील चौधरी हे करीत आहे.




















