
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
सन २०२२ या शैक्षणिक वर्षात प्रताप कॉलेज,अमळनेरच्या दोन विद्यार्थीनीने राज्य-राष्ट्र स्तरावर उल्लेखनीय कार्य पार पाडले.प्रथम,संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेचा वतीने सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात विधिमंडळ सचिवालय विधान भवनात २० ते २७ डिसेंबर या कालावधित संसदीय कार्यप्रणाली आणि प्रथा या विषयावर ४९ वा संसदीय अभ्यास वर्ग संपन्न झाले.
या वेळी १२ विद्यापीठांचे विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सहा विद्यार्थी व एक अधिव्याख्याता यांनी या वेळी सहभाग घेतला होता. यात प्रा. ननवरे नितीन मुकुंदराव, जाधव नीलम बाळू( सामाजिक शास्त्र प्रशाळा) क.ब.चौ,उ.म.वि,जळगावचे गुप्ता इशिका दिपक,सामाजिक शास्त्र प्रशालाचे एन एम सोनवणे,शितल बळीराम (एम.जे.कॉलेज, जळगाव)पवार प्रमोद भरतसिंग ( बी.पी.आर्ट्स,कॉमर्स,सायन्स कॉलेज,चाळीसगाव) दिगंबर गोकुळ(एस.एस.व्ही.पी.एस.कॉलेज, धुळे) चौधरी प्रेरणा दिनकर (एम.ए.प्रथम,राज्यशास्त्र,प्रताप कॉलेज,अमळनेर) अदिनी सक्रिय सहभाग घेतला होता.या वेळी प्रताप कॉलेजची प्रेरणा चौधरी या विद्यार्थीनीने हिवाळी अधिवेशन,नागपुर येथे उपस्थित राहून प्रश्न-उत्तराच्या वेळी मा.मंत्री महोदयाना विविध प्रश्न विचारुन चर्चा घडवून आणली,ही चर्चा गांभिर्यपूर्वक व सकारात्मक स्वरुपाची होती.म्हणून प्रेरणा चौधरी हिचे कौतुक विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,मा.सुधिर मुंनगटीवार,प्रधान सचिव राजेंद्र भगवत,मा.महादेव जानकर,मा.सुनिल जवरे(अव्वर सचिव) आदिनी केले.
‘प्रताप’ची प्रतिमा ईश्वर पाटील, एम.ए.प्रथम,राज्यशास्त्र,या विद्यार्थीनीने या वर्षात ” स्वामी विवेकानंद सुभारती विद्यापीठ, मेरठ,उत्तर प्रदेश येथे राष्ट्रीय स्तरावर पार पडलेल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये पिस्तूल शूटिंग या खेळामध्ये क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळ्गावचे नेतृत्व केले.याचप्रमाणे विभागीय स्तरावर पार पडलेल्या पिस्तोल शूटिंग स्पर्धेत सुद्धा सक्रिय सहभाग घेतला होता.प्रतिमा पाटील ही विद्यार्थीनी वरिष्ट जिमखाना विभागाची अष्टपैलू खेळाडू आहे.
या निवड व यशा बद्दल दोन्ही विद्यार्थीनींचे संस्थेचे चिटणीस डॉ.ए.बी.जैन, प्र.प्राचार्य डॉ.पी.आर.शिरोडे,उप प्राचार्य डॉ.एम.एस.वाघ,उप प्राचार्य डॉ.जे.बी.पटवर्धन,करिअर कोंन्सेलिंग सेंटरचे समन्वयक डॉ.विजय तुंटे,डॉ.हर्षवर्धन जाधव,डॉ.नलिनी पाटील,डॉ.संदीप नेरकर,डॉ.धनंजय चौधरी, प्रा.सुनिल राजपूत, डॉ.मुकेश भोळे, डॉ.ज्ञानेश्वर मराठे, ग्रंथपाल दिपक पाटील, डॉ.राखी घरटे,डॉ.रवी बाळसकर,डॉ.माधव भुसनर,प्रा.आर.सी.सरवदे,प्रा.जयेश साळवे,प्रसाद चौधरी,प्रविण डंबेलकर, दिनकर कृष्णात चौधरी,सरपंच सखुबाई बैसाणे आदिनी अभिनंदन केले आहे.




















