
जळगाव मिरर । ३१ डिसेंबर २०२२
शहरातील नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेने ३१ डिसेंबर हा दिवस सर्वत्र साजरा करण्यात येत असतो पण बेघर लोकांना हा दिवस काही विशेष महत्वाचा नसतो पण हा दिवस त्यांच्यासाठी महत्वाचा असावा यासाठी नारीशाक्तीने एक कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे.
नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था व शहर महानगरपालिका जळगाव राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत जय सद्गुरु वस्ती स्तर संघ संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र यांनी मात्र आजी आजोबांसमवेत आपला 31 डिसेंबर शनिवार रोजी उमाळा येथे प्रसिद्ध महादेव मंदिर व धनंजय व विद्या जकातदार यांच्या फार्महाउस वर अनोख्या पद्धतीने साजरा केला जवळ जवळ 30 आजी-आजोबा यावेळी उपस्थित होते प्रथमतः आजी आजोबांचे औक्षण करून त्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. विद्याताई जकातदार यांच्यामार्फत जेवण देण्यात आले. यात भरीत, कळण्याची भाकरी, पुलाव ,लाडू कढी या पदार्थांचा समावेश होता. आजी आजोबांनी मनसोक्त जेवण करून नाचण्याचा देखील आनंद लुटला.
नवीन वर्षाच्या 2023 च्या स्वागतासाठी व जाणाऱ्या 2022 ला निरोप देण्यासाठी आजी आजोबा यांच्या हस्ते केक कापण्यात येऊन हा आनंद एकमेकांमध्ये वाटण्यात आला.धनंजय जकातदार व विद्याताई जकातदार यांचे विशेष सहकार्य लाभले. याप्रसंगी नारी शक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष सौ मनिषा पाटील व जळगाव शहर महानगरपालिका तांत्रिक तज्ञ व्यवस्थापक सौ गायत्री ताई पाटील विजय सद्गुरु वस्ती स्तर संघाचे अध्यक्ष गणेश पाटील व्यवस्थापक मनोज कुलकर्णी ,विद्या जकातदार, नूतन तासखेडकर ,नेहा जगताप माधुरी शिंपी, शशी शर्मा, रेणुका हिंगु, राधिका पाटील, संगीता चौधरी, नीता वानखेडकर व काळजीवाहक राजेंद्र मराठे हर्षल वंजारी सौ शितल काटे, सचिन पाटील, सौ आशा पाटील, जितेंद्र पाटील, भारती पाटील उपस्थित होते. वाहन व्यवस्था माजी नगरसेवक अमित भाऊ भाटिया यांनी केली तसेच कवी कासार ,राहुल पाटील यांचेअनमोल सहकार्य मिळाले




















