
अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.पी.आर.शिरोडे सर दि ३१ डिसेंम्बर रोजी दीर्घकालीन सेवेतून निवृत्त झालेत, महाविद्यालयात आज आबांना निरोप देताना प्राध्यापक तसेच कर्मचारी वृंदच नव्हे तर विद्यार्थी देखील गहिवरले होते. भाषणातून सर्वानीच सरांचे तोंडभरून कौतुक केले,
एक शांत संयमी, अत्यंत हुशार,गुणवंत,प्रज्ञावंत,शिस्तप्रिय आणि विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून सरांची ओळख होती,प्राध्यापक तसेच केमिस्ट्री विभाग प्रमुख आणि उपप्राचार्य म्हणून सरांची कारकीर्द उत्तम होतीच परंतु त्याहीपेक्षा गेल्या वर्षांपासून प्राचार्य म्हणून सरांनी जे प्रशासन सांभाळले ते निश्चितच कौतुकास्पद ठरले, त्यांची ही कारकीर्द आम्ही जवळून अनुभवली,विद्यार्थी हित असो किंवा संचालक मंडळाशी समन्वय असो किंवा विद्यार्थी संघटनांचे आंदोलन असो अश्या अनेक भूमिका शिरोडे सरांनी उत्तम निभावल्या, खरेतर अजून दोन वर्षे तरी सर प्राचार्य हवे अशी सर्वांची इच्छा होती परंतु शेवटी कुठेतरी बंधने असतात आणि निवृत्ती स्वीकारावी लागते ती प्रा डॉ शिरोडे सरांनी आनंदाने स्वीकारली. सर आपण निवृत्त झाले असले तरी अजून शरीराने,मनाने आणि इच्छाशक्तीने मजबूत असल्याने अजूनही सरांचे मार्गदर्शन आपल्या मुलांना व आपल्याला लाभत राहील, हीच भावना सर्वत्र विद्यार्थ्यामध्ये आहे. प्रा.डॉ.पी.आर.शिरोडे सरांना निवृत्तीनंतर पुढील आयुष्य आरोग्यदायी आणि आनंददायी जाओ हीच शुभेच्छा.
– विक्की उत्तम जाधव






















