
जळगाव मिरर । १ जानेवारी २०२३
पाचोरा तालुक्यातील एका गावात शेतात कामासाठी गेलेल्या ३५ वर्षीय महिलेचा एकाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस स्थानकात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या ३५ वर्षीय महिला एका शेतात जात असताना संशयित आरोपी समाधान नाना चित्ते याने त्या महिलेचा वाईट उद्देशाने पाठलाग करून त्या महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न केल्याबद्द्ल महिलेने पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सफौ ज्ञानेश्वर यशवंत पाटील हे करत आहे.




















