
जळगाव मिरर / २ जानेवारी २०२३
जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथून अनधिकृत अवैध गावठी पिस्टल बाळगणा-या तरुणास जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा येथून अटक केली आहे. या प्रकरणी चोपडा शहरातील मल्हारपुरा येथील अजित गुजर बारेला याला ताब्यात घेतले आहे. त्याच्या ताब्यातून तिस हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल, एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील हे.कॉ. संदिप पाटील, गोरख बागुल, पो.ना. प्रविण मांडोळे, परेश महाजन आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना समजलेल्या माहितीच्या आधारे चोपडा शहरातील भाऊ हॉटेल परिसरातून अजित बारेला यास गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसासह अटक करण्यात आली आहे. त्याला पुढील कारवाईकामी चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




















