
जळगाव मिरर / ४ जानेवारी २०२३
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्र. कुलगुरू यांना विद्यापीठात निवडणूक आचारसंहिता लागू असतांना विद्यार्थी विकास विभागाच्या जाहीर केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी सत्यशोधक विद्यार्थी संघटना आणि जिंदगी फाउंडेशनतर्फे करण्यात आली.
दरम्यान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेटसह इतर प्राधिकरणाच्या निवडणुक प्रक्रिया सुरू असताना विद्यार्थी विकास मंडळाच्या नियुक्ती जाहीर करण्यात आल्या. यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप करत विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रा. सुनील कुलकर्णी यांनी नियुक्ती घोषित केल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांना करण्यात आली होती. अशातच विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराबाबत विद्यार्थी संघटनेमार्फत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून, मतदारांना आमिष देण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे. दरम्यान कुलगुरूंच्या भूमिकेबद्दल देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. अशात प्रा. कुलकर्णी यांनी केलेल्या नियुक्ती त्वरित रद्द करण्यात याव्या, अशी मागणी जोर धरून होती. दरम्यान काल ता. ४ रोजी सत्यशोधक विद्यार्थी संघटना व जिंदगी फाउंडेशन तर्फे प्रकलगुरूंना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देतेवेळी अविनाश तायडे, अजय पाटील, सुश्मिता भालेराव, नेहा पवार, विकास वाघ, वैशाली कोळी आदी उपस्थित होते.




















