
जळगाव मिरर / ५ जानेवारी २०२३
शहरातील नागरिकांसाठी पाणीपुरवठ्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मेहरुण येथील डिमार्ट चौकातील अमृत योजनेअंतर्गत टाकलेली पाईपलाईन आकाशवाणी मागील अस्तित्वात असलेल्या टाकीला जोडण्यात येणार असून त्यासाठी जळगाव शहराचा दि.5 जानेवारी रोजी होणारा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.
म्हणजेच दि.5 जानेवारी रोजी होणारा पाणी पुरवठा दि.6 रोजी करण्यात येईल तर दि.6 जानेवारी रोजी होणारा पाणी पुरवठा दि. 7 जानेवारी रोजी करण्यात येईल. असे पत्र महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दि.4 जानेवारी रोजी रात्री उशिरा काढले आहे. तरी जळगाव शहरातील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीन नियमित करावा असे आवाहन महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.




















