
जळगाव मिरर । ५ जानेवारी २०२३
वर्षेच्या सुरवातीला म्हणजेच 1 जानेवारी या दिवशी सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असताना निंभोरा येथील तरुणांनी मात्र दरवर्षा प्रमाणे यावर्षी ही वाघोदा रस्त्यावरील स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम राबवली यावेळी गावातील स्वानंद कृषि विज्ञान व युवाशक्ती मित्र परिवार चे कार्यकर्ते व गावातील युवा सहकारी उपस्थित होते
आज दि.०१जानेवारी २०२३* रोज रविवार या नवीन वर्षाच्या सुरुवातीस युवाशक्ती मित्र परिवारा कडून सालाबादाप्रमाणे या वर्षी ही निंभोरा स्मशान भूमीत सफाई अभियान राबविण्यात आले. नवीन वर्षाची सुरुवात ही स्वच्छतेच संदेश देऊन करावी असा निर्णय युवाशक्ती मित्र परिवाराने 5 वर्षाआधी घेतला होता आणि ते दर वर्षी न चुकता पूर्ण करू असा निर्णय मनाशी बाळगून आम्ही हे काम करत असतो .
-युवाशक्ती मित्र परिवार निंभोरा
स्वच्छता मोहीमेत यांचा होता सहभाग- श्री सुनील कोंडे,गुणवंत भंगाळे,राजीव भोगे,विवेक बोंडे,निलेश लोखंडे, दिलीप खैरे, हर्षल ठाकरे,राज खाटीक,पियुष बऱ्हाटे, गौरव काटोले इत्यादी.




















