• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

अमळनेरच्या क्रिकेट स्पर्धेत सुरत संघ ठरला ‘आमदार चषकाचे मानकरी’

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 9, 2023
in जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
अमळनेरच्या क्रिकेट स्पर्धेत सुरत संघ ठरला ‘आमदार चषकाचे मानकरी’
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या सहयोगाने अमळनेर येथे आयोजीत करण्यात आलेल्या. राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत गुजरात राज्यातील पार्थटेक्स, सुरत या संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवुन आमदार चषकाचा मानकरी हा संघ ठरला. तर प्रतिस्पर्धी एमसीए मालेगांव संघ उपविजेता ठरला. अंतिम सामना सुरु होण्या आधी आमदारांनी स्वतः फलंदाजी करुन आनंद घेतला. विजेता संघाला १ लाख ११ हजार रुपयांचे प्रथम पारीतोषीक व आमदार चषक तर उपविजेता संघाला ५५ हजार ५५५ रुपयांचे पारीतोषीक व चषक देऊन गौरविण्यात आले.

अंतिम सामना पाहण्यासाठी प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर प्रचंड न भुतो न भविष्यती अशी गर्दी झाली होती. तरुणाईने प्रचंड जल्लोष करत सामन्याचा आनंद घेतला. आ. अनिल भाईदास पाटील स्वतः पुर्ण सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. त्यांनीही तरुणाई सोबत जल्लोष केला. दु.१२वा. अंतिम सामन्यास सुरवात झाली. एमसीए मालेगांव संघाने प्रथम फलंदाजी करत १२८ धावांचे टार्गेट सुरत संघा समोर ठेवले होते. सदर टार्गेट सुरत संघाच्या उत्कृष्ट फलंदाजांनी सहजरित्या पार करत एमसीए मालेगांव संघाला पराभुत केले. एकंदरीत नामांकीत खेळांडूंची धुवांदार फलंदाजी या खेळाच्या निमित्ताने अमळनेरकरांना पहायला मिळाली. सामना आटोपल्यानंतर मैदानावर झालेला जल्लोष पाहण्याजोगा होता. शहरातील प्रतिष्ठीत मंडळी देखील हा सामना पाहण्यासाठी उपस्थित झाली होती. यानंतर बक्षिस वितरण सोहळा पार पडला. याप्रसंगी आमदारांसह खा.शि. मंडळाचे कार्याध्यक्ष हरी भिका वाणी, कार्योध्यक्ष योगेश मुंदडा, संचालक डॉ. अनिल शिंदे, प्रदीप अग्रवाल, अध्यक्ष जितेंद्र झाबक, माजी नगराध्यक्ष विनोदभैय्या पाटील, डॉ. प्रसन्न जोशी, डॉ.शरद बाविस्कर, मुन्ना शर्मा, विक्रांत पाटील, पांडुरंग महाजन, राजु फाफोरेकर, प्रविण जैन, नरेंद्र चौधरी, सुरेश परदेशी, सचिन बाळु पाटील, अॅड. यज्ञेश्वर पाटील, बंडु जैन, एपीआय विकास शिरोडे, पंकज काशिनाथ वाणी, महेंद्र पवार, रवि पाटील व पत्रकार उपस्थित होते. अतिशय जल्लोषात बक्षिस वितरण पार पडले. यावेळी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांनाही बक्षिस वितरण करण्यात आले. यात सानेगुरुजी शाळा विजेता तर जी.एस. हायस्कुल संघ उपविजेता ठरला. तसेच आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत मॅन ऑफ द सीरीज बादल मंगुकिया, बेस्ट बॅट्समन ट्रॉफी चिंतन देसाई, बेस्ट बॉलर ट्रॉफी सेनेले जोसेडलिया, बेस्ट किपर सिद्धेश देशमुख आदींना सन्मानित करण्यात आले.

पुढील वर्षी २ लाखाचे प्रथम बक्षिस-आमदारांची घोषणा
यावेळी आ.अनिल भाईदास पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना पुढील वर्षी प्रथम बक्षिस २लाखांचे तर द्वितीय बक्षिस दीड लाखांचे देण्याची घोषणा केल्याने क्रिकेट प्रेमींनी प्रचंड आनंद व्यक्त केला. यावेळी पुढे बोलतांना आमदार म्हणाले की, सर्वच संघांनी चांगले प्रदर्शन केले. राज्यभरातील जवळपास ३२ संघ यात सहभागी झाले होते. प्रामुख्याने अमळनेर तालुका क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख अभिषेक विनोद पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय चांगली मेहनत घेतली. जळगांव येथील समालोचक पद्माकर पाटील यांनी संपुर्ण स्पर्धा संपेपर्यंत थांबुन रंगत आणली. ऑनलाईनच्या माध्यमातून देखील सामने पाहता येत असल्याने सुमारे २लाखांपेक्षा अधीक शौकीनांनी हे सामने पाहीले. हे आमदार चषकाचे वैशिष्ट्य असुन येथूनच इंटरनॅशनल खेळाडु निर्माण झाला पाहीजे हीच आपली भावना आहे. पुढील वर्षी महिलांची देखील टुर्नामेंट भरविण्याचा आपला मानस असुन त्या सोबतच फुटबॉल, बॅडमिंटन, खो-खो, कबड्डी आदी स्पर्धा घेऊन तरुणाईला मैदानी खेळाकडे वळविण्याचा व त्यांचे आरोग्य सुदृढ करण्याचा प्रयत्न असेल अशी भावना आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त करत उपस्थित क्रिकेट प्रेमींचे आभार व्यक्त केले.

सदर स्पर्धा यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे प्रमुख अभिषेक विनोद पाटील, गुणवंत पाटील, निलेश महाजन, दत्ता वाणी, रवि पाटील, मिलींद शिंदे, मेघराज महाजन, संदीप सराफ, संजय पाटील, जितेन साळुंके, मंगेश मोरे, ग्राऊंडमन अश्विन
पाटील आदींनी परिश्रम घेतले.

सदर आमदार चषक स्पर्धेसाठी आमदारांसह ओमप्रकाश मुंदडा, पंकज मराठे, प्रकाश अमृतकर, स्वादिष्ट नमकीनचे निलेश पाटील, कुसुमाई ग्रुपचे महेंद्र पवार, सुर्या बॅटरीचे नरेंद्र चौधरी, डॉ. अनिल शिंदे, भरत ललवाणी, डॉ. शरद बाविस्कर, भावेश जैन, गौरव पाटील आदींनी आर्थीक सहकार्य केले. दरम्यान आयोजन समिती प्रमुख तथा अर्बन बँकेचे चेअरमन अभिषेक विनोद पाटील हे लहानपणा पासुन क्रिकेट शौकीन असुन आतापर्यंत झालेल्या अनेक टुर्नामेंट यशस्वी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तरुणाईला मैदानी खेळाशी जुळवुन ठेवण्यात ते नेहमीच प्रयत्नशील असतात. या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी देखील ते आग्रही होते. आमदारांनी त्यांच्यासह संपुर्ण आयोजन समितीला होकार देऊन त्यांचा उत्साह वाढविल्याने या समितीने अतिशय मेहनत घेऊन ही आमदार चषक स्पर्धा यशस्वी केली. उत्कृष्ट आयोजनाबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले.

Related Posts

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घराला कुलूप लावून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला : चाळीसगावात ६.४५ लाखांची चोरी!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group