
जळगाव मिरर । ९ जानेवारी २०२३
शहरातील रोझलँड इंग्लिश मीडियम शाळेत नुकतेच विज्ञान प्रदर्शनात उत्साहात साजरा झाला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ.रोजमिन खिमानी प्रधान यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे विविध प्रकल्प सादर केले होते. या प्रदर्शनाचे शिक्षकांनी कौतुकहि केले होते.
रोझलँड इंग्लिश मीडियम शाळेत दि ९ जानेवारी सोमवार रोजी रोझलँड इंग्लिश मीडियम शाळेत विज्ञान प्रदर्शनात विजयी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. या विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे विविध प्रकल्प सादर केले , त्याठिकाणी उत्तम प्रकल्पांची निवड करण्यात आली. व विजेत्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या अध्यक्षा सौ. रोजमिन खिमानी प्रधान यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देण्यात आले.या कार्यक्रमात USA टीम कडून विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन मिळाले.




















