
जळगाव मिरर । १२ जानेवारी २०२३ ।
शहरातील संभाजी ब्रिगेडतर्फे १२ जानेवारी जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिजाऊ माँसाहेब यांची ४२५ वि जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवमती कामींनीताई नरेंद्र पाटील यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. तसेच जिजाऊ जयंती निमित्त कु.दिप्ती कमलाकर पाटील हिने राजमाता जिजाऊ यांच्या वर पोवाडा सादर केला व जिजाऊ जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाअध्यक्ष तुषार सावंत,महानगरअध्यक्ष संदीप पाटील, उपमहंनगराध्यक्ष सौ, मायाताई पवार, सतीश लाठी,मयूर चौधरी, विलास पाटील,दिलीप पवार,राकेश जैन,प्रफुल्ल पाटील,विशाल पाटील,गोपाल पाटील, सौ.अर्चना पाटील,स्नेहल पाटील, हर्षदा सावंत,वैशाली सोनवणे, संगीत पाटिल, रुपाली पवार,शोभा लाठी, पूजा चौधरी,लताताई पाटील,सविता पाटील,प्रतिभा पाटील,साधना पाटील तसेच परिसरातील मोठ्या प्रमाणात महिला व संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांनी पूजन करून माल्यार्पण केले.





















