
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
जळगाव जिल्हा धोबी समाजाच्या दिनदर्शिकेचे अमळनेर शहरात मान्यवरांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले.
परिट(धोबी) समाजाची दिनदर्शिका दरवर्षाप्रमाणे यंदाही जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक गावपातळीवर दिनदर्शिका समाजबांधवापर्यंत पोहोचणार आहे. नुकतेच जळगाव शहरातील संत गाडगेबाबा उद्यान येथे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले होते. त्याचाच भाग म्हणून अमळनेर तालुक्यातही प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश ठाकरे, जळगाव जिल्हाध्यक्ष अरूण राऊत, शंकरराव निंबाळकर, रघुनाथ भदाणे, विजय वाघ, भारत जाधव यांची प्रमुख उपस्थित होती.




















