
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
खा.शि. मंडळाच्या श्रीमती द्रौ.रा कन्याशाळेत सकाळ व दुपार विभागाच्यावतीने स्वामी विवेकानंद व जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.एस. एस.सूर्यवंशी,उपमुख्याध्यापक श्री.बी.एस.पाटील, जेष्ठ शिक्षक श्री.के.एस.मोरे यांनी प्रतिमापूजन केले.
त्यांनतर राशी पाटील,अस्मा पिंजारी, पूनम पाटील ,उर्वशी लोहार,ऋतिका पाटील, जिज्ञासा पवार, मानसी चौधरी, मानसी ठाकरे, वैष्णवी पाटील,प्रियंका पाटील,रूपाली कोळी, देवयानी पाटील, पल्लवी पाटील यासर्व विद्यार्थीनिंनी भाषणे दिली.काही विद्यार्थीनिंनी व शिक्षक श्री डि.एन.पालवे यांनी गाणे सादर केले.प.ज.ने. समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी विद्या पगारे, अश्विनी बिलकुले, प्रियंका देसाई, दक्षिता पाटील यांनी कार्यक्रमाचे पूर्ण संचालन केले.




















